Author

Manoj Dani

श्री. मनोज दाणी हे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर आणि भारत इतिहास
संशोधक मंडळ, पुणे या संस्थथांचे आजीव सभासद असून आज एका दशकाहून
अधि क काळ पानिपतच्या तिसऱ्या लढाईवर संशोधन करत आहेत. त्यांनी आजवर
भारत, इंग्लंड , अमेरिका, आयर्लंड , जपान, रशिया, कतार, सौदी अरेबिया, पाकिस्तान
या देशाांतील संग्रहालयातील हस्तलिखिते, चित्रे, कागदपत्रे आणि स्थानिक
लोकाांकडील माहि ती मि ळवून त्यातील नवीन इति हास उजेडात आणला आहे.
पानिपत लढाईशी संबंधि त चित्रे या विषयावरील त्यांचे 'Battle of Panipat in Light of Rediscovered Paintings' हे इंग्रजी पुस्तक २०२० साली प्रसिद्ध झालेले
आहे.
नोकरीनिमित्त अमेरिकेत वास्तव्य असलेल्या श्री. मनोज दाणी याांचे शिक्षण
अहमदनगर आणि पुणे येथे झाले असून त्यांनी संगणक अभियाांत्रिकी या विषयातील
पदवी मिळवलेली आहे. संगणक शास्त्रातील दोन पेटंट्स त्यांच्या नावावर आहेत.
शनिवार वाड्यातील गणेशोत्सव, सिहंगडाची लढाई, अजिक्यंतारा किल्ल्याचा वेढा, छत्रपती संभाजी
महाराजाांचे अप्रकाशित चित्र , सातारकर छत्रपती यांची हिऱ्याची पगडी अश्या काही
उल्लेखनीय विषयांवर त्यांनी मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये
लिहिलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजाांचे आजोबा लखुजी जाधवराव याांचे
चित्र उजेडात आणण्याचा बहुमान त्ययांना लाभलेला आहे. भारत इतिहास
संशोधक मंडळातील चित्रे आणि फार्सी कागदपत्रे, बिकानेर येथील राजस्थान
पुराभिलेखागारातील अप्रकाशित कागदपत्रे याच्याविषयी ते सध्या अभ्यास करत
असून या विषयांवर भविष्य काळात अधिक लेखन करण्याचा त्यांचा मनोदय आहे.

Author's books

Adnyat Panipat – अज्ञात पानिपत

Original price was: ₹1,300.00.Current price is: ₹1,000.00.

The Marathas were the last indigenous empire-builders of India. They leapt into prominence suddenly and swiftly, but the rapid expansion of their empire was arrested by the defeat at the third battle of Panipat on 14 January 1761. Unfortunately, the authentic, comprehensive and analytical scholarly accounts of this momentous battle are woefully short in number. This work in the Marathi language fills the gap. Specifically, this monograph provides the in-depth information on the following topics for the first time :
– Partition of India in 1757 and the rise of the Afghan nation
– Sabaji Patil Shinde and his brave deeds
– New details about the battle of Barari and how Dattaji Shinde fought the Afghans and Rohillas
– Why did the Marathas position their artillary on top of the Jama Masjid in Delhi?
– What was the total expenditure of Sadashivrao Bhau?
– Sadashivrao Bhau’s valor while in conversation with the Afghan diplomats
– The Kohinoor diamond would have been in Pune, if …
Many such unknown facts are explored in depth in this Adnyat Panipat book written by Manoj Dani. A must-read for any history lover!