Author

Dr. Avinash Sowani

डॉ. अविनाश सोवनी शिक्षण आणि व्यवसायाने आर्किटेक्ट असून ते या व्यवसायात गेली पस्तीस वर्ष कार्यरत आहेत. ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धन हे त्यांचे आवडीचे क्षेत्र असल्याने त्यांनी या प्रकारची अनेक कामे पूर्ण केली आहेत. तरीही, त्यांचा खरा ओढा इतिहासाकडे असल्याने त्यांनी इतिहासाच्या अभ्यासासाठी इ.स. १९९० मध्ये त्यांनी पुण्यातील ख्यातनाम भारत इतिहास संशोधक मंडळ या संस्थेचे आजीव सभासदत्व घेतले आणि आपला व्यवसाय सांभाळून त्यांनी मराठ्यांच्या, विशेषत: पेशवाईच्या इतिहासाचा विविध अंगांनी सखोल अभ्यास केला. मराठ्यांच्या इतिहासातील अप्रसिद्ध बखरी शोधून काढून त्यांनी ‘ऐतिहासिक बखरी, खंड १ व २’ या ग्रंथांद्वारे प्रकाशित करून त्या अभ्यासकांना उपलब्ध करून दिल्या.
मराठ्यांची वास्तुकला आणि मराठा कालखंडातील नगररचना हे दोन विषय त्यांना जवळचे असल्यामुळे, यावर विस्तृत संशोधन करून त्यांनी इ. स. २००८ मध्ये ‘मराठा वास्तुशैली’ या विषयावरील प्रबंधास डॉक्टरेट संलग्नता प्राप्त केली आणि पाठोपाठ ‘मराठा कालखंडातील नगरविकास व नगररचना’ या विषयांवर प्रबंध सादर करून इ. स. २०११ मध्ये पीएच.डी. पदवी संपादन केली.
पुणे शहराच्या विकासाच्या इतिहासावरही त्यांनी गेली पंचवीस वर्ष विस्तृत संशोधन आणि लेखन केले आहे. त्यांनी सकाळ या वृत्तपत्रात, याच विषयावरील दोन दीर्घ लेखमाला लिहीलेल्या आहेत. शिवाय अन्यत्रही त्यांनी बरेच लेखन केले आहे. पुणे शहरातील विस्मृतीत गेलेल्या वास्तुस्थलांचा मागोवा घेणारा, त्यांनी लिहीलेला ‘हरवलेले पुणे’ हा ग्रंथही प्रसिद्ध झाला आहे.
इतिहास आणि आर्किटेक्चर या विषयांवर त्यांनी पुष्कळ लेखन केलेले असून ‘मराठा वास्तुशैली’ या विषयावर अनेक व्याख्यानेही दिलेली आहेत.

Date of Birth 10/Aug/1955
Language Marathi, Hindi, English

Author's books

Akherache Karasthan – अखेरचे कारस्थान

320.00

Akherache Karasthan book is a link between the past and the present of the historic account of an institution. With the limitations insisted upon the ancestors, the next six generations maintained the norms that led the eighth generation to prosperity. While maintaining the ancestral norms, no one knew it was a major conspiracy 7 generations before. The 7th generation just deduced the mysterious plot and the manner proved quite enthralling. The engrossing narration from the references of latter – Peshwa period arouses and keeps up the readers interest till the end written by Dr. Avinash Sowani