Author

Dr. Sachin S. Pendse

सचिन सदाशिव पेंडसे हे तोलानी महाविद्यालय, अंधेरी, पूर्व, मुंबई येथे २५ वर्षे अध्यापन करीत होते. मुंबई विद्यापीठातून भूगोल विषयात पदव्युत्तर पदवी आणि विद्यावाचस्पती (Ph.D) हि पदवी मिळवली होती. ते भारतीय नौसेनेच्या पश्चिम कामांडच्या आधिपत्याखालील ‘मॅरीटाइम हिस्ट्री सोसाईटी’ ह्या संस्थेच्या शैक्षणिक परिषेदेचे सभासद होते. त्यांनी अनेक ठिकाणी भारतीय नाविक इतिहासा संबंधी लेखन आणि व्याख्याने दिली होती. अमेरिकन नौदलाच्या अनापोलीस येथील “यु. स. नेव्हल अकॅडेमी” आणि “इंडियन नेव्हल अकॅडेमी”, कन्नूर, केरळ येथे व्याख्याने दिलेली आहेत. “युनिवर्सिटी ऑफ पॅरीस” आणि फ्रेंच सरकारच्याच्या “असोसीएशन ओशनिडीस’ ह्या ‘जागतिक नाविक इतिहासा वरील संयुक्त प्रकल्पात, भारतीय नाविक इतिहासातील मराठा आरमार आणि पारंपारिक जहाज बांधणी ह्या विषयावरील निबंध प्रसिद्ध झाले होते.
‘मॅरीटाइम हिस्ट्री सोसाईटी’ने पुरस्कृत Maritime Heritage of Konkan हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे, याशिवाय Maritime Heritage of Goa and Uttar Kannada, Navigational Hazards and Landmarks a Special study of south Gujarat and Konkan ह्या पुस्तकात सह लेखक म्हणून काम केलेलं आहे. आतापर्यंत सह लेखक म्हणून पर्यावरण अभ्यास आणि पर्यावरण व्यवस्थापन ह्या विषयावर मुंबई, नागपूर. गुजरात अशा अनेक विद्यापीठांच्या अभ्यास क्रमावर आधारित पुस्तके लिहिली आहेत.

Date of Birth 14/Dec/1965
Date of Death 13/Jan/2018

Author's books

Maratha Armar Ek Anokhe Parva – मराठा आरमार-एक अनोखे पर्व

400.00

Maratha Armar – Ek Anokhe Parva gives analysis and detailed information right from the establishment of the Maratha naval force by Chhatrapati Shivaji Maharaj, progressive contribution and development by the Angre dynasty, constitution of Naval force, ships, cannons, defense tactics with supportive historic references, thus making it a detailed summary of distinctive era of Maratha Navy written by Dr. Sachin Pendse