विश्वसनीय पुराव्यांवर आधारलेल्या ऐतिहासिक घराण्यांच्या वंशावळी हे इतिहासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. यात मुघल, आदिलशाह, कुत्बशाह, निजामशाह या सुलतानांच्या वंशावळी दिलेल्या आहेतच. परंतु कदंब, शिलाहार, विजयनगर सम्राट, छत्रपती शिवाजीमहाराज यांच्यासारख्या राजे-महाराजे यांच्याही वंशावळींचा समावेश केलेला आहे. तसेच पेशवे, प्रतिनिधी, सचिव, पंडितराव, अमात्य वगैरे छत्रपतींच्या सेवकांच्या वंशावळी, प्रतापराव गुजर, संताजी घोरपडे, धनाजी जाधव यांच्यासारख्या सेनापतींच्या वंशावळी, गावातील जोशी, कुलकर्णी, देशपांडे, चौगुले या वतनदारांच्या वंशावळी आणि खुश्रुशेठ मोदी, धोंडीबा माधव गोंधळी, कवी ज्ञानसागर, मथुरेतील शिवकालीन तीर्थोपाध्ये, जिवा महाले, भीमसेन सक्सेना यांच्यासारख्या मध्ययुगीन इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या व्यक्तिंच्या वंशावळीदेखील समाविष्ट केलेल्या आहेत.
त्यामुळे ऐतिहासिक घराण्यांच्या वंशावळी हे पुस्तक इतिहास संशोधक, अभ्यासक आणि इतिहास प्रेमी मंडळीना उपयुक्त ठरणार आहेच, पण शाळा, विद्यालये व महाविद्यालये यातील विद्यार्थी व शिक्षक यांच्या इतिहासाबद्दलच्या माहितीच्या दृष्टीकोनातूनही हे महत्त्वाचे पुस्तक आहे. या पुस्तकाचे संपादन इतिहास संशोधक महेश तेंडुलकर यांनी केलेले आहे. या पुस्तकात एकूण ३१३ घराण्यांच्या वंशावळी दिलेल्या आहेत.
Original price was: ₹450.00.₹350.00Current price is: ₹350.00.
Aitihasik Gharanyanchya Vanshawali – ऐतिहासिक घराण्यांच्या वंशावळी
Genealogies of historical families based on reliable evidence is an important tool of history. Aitihasik Gharanyanchya Vanshawali book contains the genealogies of Mughal, Adilshah, Qutbshah, Nizamshah sultans, Kadamba, Shilahar, Vijayanagar emperor, Chhatrapati Shivaji Maharaj, Peshwas and so on. Hence the genealogy of historical families is an important source of history for history researchers, scholars and history lovers. This book is edited by history researcher Mahesh Tendulkar. This book contains Genealogies of 313 historical families.
In stock
Weight | 490 g |
---|---|
Dimensions | 18 × 2 × 24 cm |
First Edition | 2023 |
Format | Paperback |
Pages | 294 |
Language | Marathi |
ISBN | 978-93-90129-06-5 |
Also available at |