Original price was: ₹525.00.Current price is: ₹450.00.

Chhatrapati Shivaji Maharaj va Ingraj – छत्रपती शिवाजी महाराज व इंग्रज

Authored by Sandeep Thakare, the book Chhatrapati Shivaji Maharaj va Ingraj offers a comprehensive look at the complex relationship between Shivaji Maharaj and the British, detailing:
Diplomacy & Treaties: The commercial ties, English envoys visiting Raigad, and various treaty attempts.
Military & Naval Conflicts: Direct naval skirmishes and British duplicity during Shivaji Maharaj’s conflict with the Siddi of Janjira.
Historical Records: Accounts of his movements as documented in British correspondence.
Geopolitics: The stance of the British and their perspective on Shivaji Maharaj’s interactions with other major powers of the era, including the Mughals, Adil Shah, Portuguese, and Dutch.
The book serves as a detailed historical exposition aimed at providing readers with deep insights into the strategic, commercial, and adversarial dynamics between the Maratha Empire and the British.

In stock

या भूमीस सातासमुद्रापलीकडून आलेल्या युरोपियन लोकांचा भविष्यात होऊ घातलेला धोका ओळखून त्यावर अंमल करणारे छ. शिवाजी महाराज हे तत्कालीन एकमेव भारतीय सत्ताधीश होते.
…..शिवाजी महाराज हे या पुढारलेल्या नौदलधारी पाश्चिमात्त्यांना रोखण्याचा केवळ विचार करून थांबले नाहीत तर त्यांचा सरळसरळ सामना करण्यासाठी महाराजांनी सागरात प्रत्यक्ष आरमार उभारून पाश्चिमात्यांना धाक निर्माण केला.
छत्रपती शिवाजी महाराज व इंग्रज या पुस्तकात त्यांच्यातील व्यापारी संबंध, इंग्रजांनी पत्रांतून रेखाटलेल्या शिवाजी महाराजांच्या हालचाली, इंग्रजांनी शिवाजी महाराजांच्या विरुद्ध घेतलेल्या भूमिका, महाराजांच्या स्वाऱ्यांदरम्यान इंग्रज वखारींना बसलेले धक्के, इंग्रज व शिवाजी महाराज यांच्यात झालेले तहाचे प्रयत्न, इंग्रजी दूतांचे रायगडावरील आगमन, शिवाजी महाराज व जंजिऱ्याचा सिद्दी यांच्यातील संघर्षात इंग्रजांचे दुटप्पी वर्तन, शिवाजी महाराज व इंग्रज यांच्यात उद्भवलेला नाविक संघर्ष, शिवाजी महाराजांच्या मुघल, आदिलशहा, रुस्तुमेजमा, पोर्तुगीज, डच यांच्यासोबत आलेल्या संबंधात इंग्रजांची भूमिका व दृष्टिकोन अशा विविध बाबींचे विवेचन करण्यात आले आहे.
मराठी वाचकांना छत्रपती शिवाजी महाराज व इंग्रज यांच्या परस्पर संबंधांविषयी अधिक माहिती मिळावी या हेतूने या पुस्तकाचे लेखन संदीप ठाकरे यांनी केलेले आहे. या विषयावर सखोलपणे प्रकाश टाकणारे अशा प्रकारचे मराठीतील हे पहिलेच पुस्तक होय.

Weight 400 g
Dimensions 14.5 × 3 × 21.5 cm
First Edition

05/Apr/2026

Format

Hardcover

Language

Marathi

Pages

296

ISBN

978-93-90129-96-6

Also available at

https://www.amazon.in/dp/9390129966