Sagar Surve
सागर माधुरी मधुकर सुर्वे हे रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे राहतात. त्यांचे वाणिज्य शाखेत पदवीधर शिक्षण झाले असून इतिहासाची आवड असल्यामुळे त्यांनी होरायझन्स संस्थेमार्फत प्राचीन भारतीय संस्कृतिबंध मध्ये प्रमाणपत्र घेतलेले आहे. कर्जत तालुक्यातील भिवगड ह्या गडावरील पाण्याच्या टाक्यातील शिल्पाविषयी शोधनिबंध मुंबई विद्यापीठात त्यांनी मांडला आहे. शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबर ते गडकिल्ले, पुरातन मंदिरे व ऐतिहासिक स्थळांना अभ्यास दौऱ्यातून भेट देत असतात तसेच छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक ठिकाणी ते व्याख्यानांसाठी जात असतात. भारतीय इतिहास संशोधक मंडळ, पुणे ह्या संस्थेचे ते आजीव सभासद आहेत. विविध पुस्तकांचा परिचय व इतर ऐतिहासिक विषयांवर ते www.sagarsurve.com ह्या संकेतस्थळावर ब्लॉगलेखन करत असतात. ऐतिहासिक स्थळं माहित व्हावीत व त्यांचा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहचावा म्ह्णून मुंबई आवृत्तीतील महाराष्ट्र टाईम्स, तरुण भारत व गोव्यातील गोवन वार्ता इ. वृत्तपत्रात ते लेखन करतात तसेच विविध दिवाळी अंक, मासिके व त्रैमासिकांमध्येसुद्धा त्यांचे लेख येत असतात.