Dr. Lata Aklujkar
डॉ.सौ.लता अकलूजकर या इतिहास विषय घेऊन एम.ए.पी.एचडी. झालेल्या निवृत्त प्राध्यापिका आहेत. दयानंद महाविद्यालय, सोलापूर येथे त्या इतिहास विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होत्या. इतिहास संशोधिका म्हणून त्या प्रसिध्द आहेत. त्यांनी आप्लया महाविद्यालयात ऐतिहासिक वास्तूसंग्रहालय स्थापन केलेले आहे. आपल्या कार्यकाळात त्यांनी विद्यार्थी इतिहास परिषदेची स्थापना करुन नवोदित संशोधक विद्यार्थ्यांसाठी हक्काचे व्यासपीठ सोलापूर जिल्ह्यात निर्माण केले आहे. स्थानिक, राजस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी एकूण पंधरा परिषदांचे आयोजन केले आहे. तसेच सतत वीस वर्षे त्यांनी ब्राह्मी लिपी व मोडी लिपीचे वर्ग विद्यार्थ्यांसाठी घेतले होते. इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमावरील डिग्री व मास्टर डिग्रीच्या वर्गांकरिता त्यांनी एकूण चाळीस ग्रंथ लिहिलेले आहेत. संशोधनपर पाच ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत.
श्रीलंका आणि इराण येथील आंतरराष्ट्रीय इतिहास परिषदेसाठी त्यांची निवड झालेली होती. महाराष्ट्रातील वीरगळ अभ्यासकांपैकी त्या श्रेष्ठ दर्जाच्या अभ्यासिका मानल्या जातात. वाई येथून प्रकाशित होणाऱ्या मराठी विश्वकोशाच्या मध्ययुगीन कालखंडासाठी त्या तज्ज्ञ सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. किल्ले, नाणी, वीरगळ, मूर्ती, मंदिरे, विषयांवर त्या जाहीर व्याख्याने देतात. अशा व्यक्तिमत्वाच्या या लेखिकेस लंडनच्या केंब्रिज युनिवर्सिटीतर्फे सात पुरस्कार मिळाले आहेत.
Date of Birth
Language
Marathi, Hindi, English, Bramhi