Ankur Kane
श्री अंकुर काणे हे इतिहासाचे पदवीधारक आहेत. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे येथून ते इतिहास विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. वाचन आणि भटकंतीची आवड असून त्यांनी मराठी विश्वकोशातील इतिहास विभागात अनेक लेखांचे लेखन आणि परीक्षण केलेले आहे. दुर्गभ्रमण हा त्यांचा छंद असून महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांवर त्यांनी भटकंती केली आहे. दुर्गसंवर्धनाच्या अनेक मोहिमांमध्ये त्यांनी सक्रीय सहभाग घेतला आहे. पुरातत्व, प्राचीन मंदिरे आणि लेणीसमूह हे त्यांचे अभ्यासाचे विषय असून सातवाहन काळ आणि त्याकाळातील व्यापार, व्यापारीमार्ग तसेच बंदरे हे त्यांचे विशेष अभ्यासाचे विषय आहेत. भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे या संस्थेचे ते आजीव सभासद आहेत. अनेक महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमध्ये ते गेस्ट लेक्चरर म्हणून जात असतात तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यास सहली सुद्धा ते आयोजित करतात.
Date of Birth
28/May/1989