श्रीमंत माधवराव पेशवा व्यक्ति आणि कार्य

     वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी गादीवर आलेला मराठी साम्राज्याचा निष्कलंक आणि कर्तबगार पेशवा म्हणजे थोरले माधवराव. केवळ अकरा वर्षांची कारकीर्द आणि वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी मृत्यू, पण या अवधीतही या पेशव्याने पानिपतच्या मानहानीकारक पराभवाचा बदला घेतला, मोडून पडू पाहणाऱ्या सबंध राज्याचा डोलारा सावरला.
     केवळ निजाम-हैदर नव्हे तर राघोबादादांसारख्या सख्ख्या चुलत्यालाही वठणीवर आणून माधवरावांनी एक नवा पायंडा पाडला, आणि अतिशय अल्पावधीतच मराठ्यांचा दरारा सबंध हिंदुस्थानभर पुन्हा निर्माण केला. अशा या तरुण कर्तबगार पेशव्याचे हे साधार चरित्रं!

Author: Guruprasad Kanitkar
Parag Pimpalkhare
Publication: 13.04.2021
Price: 450/- Rupees
Purchase: Sahyadri Books, Amazon, FlipKart
ISBN: 978-93-90129-02-7