Jagdish Lanjekar
जगदीश रामचंद्र लांजेकर यांचा जन्म आणि शिक्षण वाई ( जिल्हा - सातारा) येथे झाले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वाई येथील द्रविड कनिष्ठ महाविद्यालयातून उच्च माध्यमिक (वाणिज्य शाखा) शालांत परीक्षा पुणे बोर्डात गुणवत्ता यादीत चौथा क्रमांकाने उत्तीर्ण; तसेच दोन विषयात सर्वप्रथम आल्याबद्दल बोर्डाची पारितोषिके प्राप्त. एम. कॉम. नंतर याच शाळेतील व्यवसाय शिक्षण विभागात सुमारे 12 वर्षे ‘अकाउंटिंग अँड ऑडिटिंग’ या अभ्यासक्रमासाठी निदेशक म्हणून काम केले. ते करीत असताना जी. डी. सी. अँड ए., एम्. फील. व पी. एच. डी. ( बँकिंग) पूर्ण केले.
सन 2005 पासून डे. ए. सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य ( वरिष्ठ) महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य. सन 2009 पासून संस्थेचा आजीव सदस्य व सन 2010 पासून महाविद्यालयाचा उपप्राचार्य म्हणून कार्य करीत आहे. अध्यापन करीत असतानाच एम.बी.ए. ( फायनान्स), एम. ए. ( अर्थशास्त्र), सेट या परीक्षा उत्तीर्ण. महाविद्यालयात बँकिंग अँड फायनान्स या विभागाचा विभागप्रमुख, वसतिगृहप्रमुख तसेच संस्थेच्या विविध समित्यांवर कार्यरत आहे.
पुणे विद्यापीठात ‘बँकिंग’ तसेच ‘बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन’ या विषयांचा पी.एच.डी. साठीचा मान्यता प्राप्त मार्गदर्शक. या विद्यापीठातील ‘बँकिंग, फायनान्स अँड इन्शुरन्स’ या अभ्यास मंडळाचा सदस्य
इतिहास संकलन समिती, जम्मू- कश्मीर अध्ययन केंद्र पुणे या संस्थांमध्ये सक्रिय सहभाग. पाठ्यपुस्तके, चरित्र ग्रंथ, पर्यटन विषयक अनेक पुस्तकांचे लेखन, विविध विषयांवरील शोधनिबंध आणि शोध प्रकल्प यांचे लेखन.