शंभूप्रताप दिनविशेष

छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या साली घडलेल्या घटना लेखकाने दिनवार १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कालावधीत मांडलेल्या आहेत. घटनेच्या तारखेच्या दिवशी तिथी काय होती, ते सुद्धा दिलेले आहे. प्रत्येक घटनेचा संदर्भ दिलेला आहे.एका अर्थाने ही संभाजी महाराजांची रोजनिशीच आहे.

त्यामुळे संभाजी महाराजांच्या आयुष्यात रोज काय काय घडत होते हे या पुस्तकात स्पष्ट होते. कालच्या इतिहासात "आज" शंभूराजांनी काय केले याची माहिती घेवून प्रेरणादायी दिवस सुरु करावा असे हे माहितीपूर्ण पुस्तक आहे.

लेखक: उदय संखे, उल्का संखे
प्रकाशन: १६.०१.२०२०
किंमत: ३५०/- रुपये
Purchase: Sahyadri Books, Amazon, FlipKart
ISBN: 978-81-939895-5-5