शनिवारवाड्यातील रत्नशाळा

    अलंकारांचा वापर सणवार, उत्सव, समारंभ अशा प्रसंगी आजही होतोच. परंतु पेशवाकाळात वस्त्रांइतकेच अलंकारांना महत्त्व होते. पहिले तीन पेशवा - बाळाजी विश्वनाथ, थोरले बाजीराव व नानासाहेब यांच्या कारकीर्दीत महाराष्ट्रातील अलंकाराची परंपरा उत्कर्षाला पोचली. इतकेच नाही तर देवघरातील देवही सोन्या-चांदीचे व हिऱ्या-माणकांचे बनविण्यात आले. हत्ती, घोडे यांनाही रत्नजडित अलंकार केले गेले तर खेळणीही सोन्या-चांदीची आणि रत्नजडित झाली. स्त्रियांच्या पैठणीतही ३।। तोळे सोने वापरत. सन १८०८ मध्ये दुसऱ्या बाजीरावाने विविध रत्नं आणि नीळ जडविलेल्या सोन्याच्या १६ सोंगट्या आणि सोन्याचेच ३ फासे खरेदी केल्याची नोंद आहे.
     या पेशव्यांच्या शनिवारवाड्यातील जवाहिरखान्यात जमा असलेले रत्नजडित, सोने-चांदीचे अलंकार आणि वस्तू यांची सन १७८३ मधील मोजदाद प्रामुख्याने या पुस्तकात दिलेली आहे.
    यामध्ये पेशव्यांकडील स्त्री-पुरुष यांचे वैयक्तिक अलंकार आणि वस्तू, प्रत्येकाच्या देवघरातील देव, त्यांचे अलंकार आणि उपकरणी, तसेच काही रत्नजडित शस्त्रे, प्राणी, पक्षी, खेळणी इत्यादीची आणि त्याकाळातील काही सरदार, सावकार यांच्याकडील अलंकारांची माहिती दिलेली आहे.
    या पुस्तकातील माहिती वाचून पेशवाईतील वैभवाची अंशत: ओळख होईल अशी खात्री आहे.

लेखक: सौ. भास्वती सोमण
प्रकाशन: ०८.०८.२०२०
किंमत: २७५/- रुपये
Purchase: Sahyadri Books, Amazon, FlipKart
ISBN: 978-81-939895-7-9