गाथा प्राचीन महाराष्ट्राची : भाग १

     प्राचीन महाराष्ट्र ते मध्ययुगापर्यंतचा अभ्यास करताना सर्वांगयुक्त प्रकाश पडेल असे पुस्तक उपलब्ध नव्हते, ती तूट भरून काढण्याचा प्रयत्न म्हणजे आमचे हे पुस्तक! ह्या पुस्तकाची सुरुवात होते, भौगोलिक प्रकरणातून. कारण भूगोल माहीत असला की, इतिहास समजायला सोपा जातो. त्यानंतर सातवाहनकालीन व्यापार ते अजंठा येथील आविष्कारापर्यंत सर्व प्रमुख बाबींवर या पुस्तकातून ससंदर्भ प्रकाश टाकला आहे.
     तसेच प्राचीन महाराष्ट्रातील आद्यग्रंथ गाथासप्तशती, राजकीय सत्ता आणि मराठी ह्या भाषेचा पाया कसा रचला? ह्या बाबींवर स्वतंत्र प्रकरणे आहेत. मध्ययुगात यादवांनी राज्य नव्हे तर साम्राज्य उभे केले, पण त्या साम्राज्याचा चटका लावणारा अस्त कसा झाला? याचे सुद्धा उत्तर या पुस्तकातून मिळते.

Author: Ankur Kane, Sagar Surve
Sampada Kulkarni, Shweta Kajale
Publication: 21.02.2021
Price: 250/- Rupees
Purchase: Sahyadri Books, Amazon, FlipKart
ISBN: 978-93-90129-03-4